Uddhav Thackeray : गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, उद्धव ठाकरे असं का म्हणालेत?
सगळं शांततेत सुरू असताना एक फोन आला. त्यानंतर जालना येथील आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. हा फोन कुणाचा होता. त्याला शिक्षा झाली पाहिजे, असं उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं.
जालना, ३ सप्टेंबर २०२३ : जालना येथे आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. लोकांवर निर्घृण हल्ला केला आहे. एका ताईचं डोकं फोडलं आहे. कुणाच्या डोक्यामध्ये शर्रा शिरला आहे. कुणाच्या चेहऱ्यावर मारहाण झाली आहे. आंदोलनकर्ते हे काही अतिरेकी नाहीत. शांततेच्या मार्गाने उपोषण करतात. असं बिनडोकं सरकार महाराष्ट्राच्या जनतेने कधी पाहिलं नसेल. सगळं शांततेत सुरू असताना एक फोन आला. त्यानंतर जालना येथील आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. हा फोन कुणाचा होता. त्याला शिक्षा झाली पाहिजे, असं उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं. गोवारींवर लाठीमार झाला होता. तेव्हा पिचड यांचा राजीनामा घेण्यात आला होता. तसंच यावेळी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे. ही जनतेची भावना आहे. हीच आमचीसुद्धा मागणी असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. आंदोलनकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते तत्काळ मागे घेतले गेले पाहिजे. त्यांनी कुठंही शांतता बिघडवली नव्हती. आंदोलकांवर हल्ला कुणाच्या आदेशाने झाला हे आधी शोधले पाहिजे. राज्यात कुठं काय चाललं याची खडानखडा माहिती गुप्तहेर विभाग मुख्यंत्र्यांना देत असतो.