ED नाही, काडी नाही, की बॉक्स आला नाही मग बंडखोर आमदारांना काय तो दांडा, काय ते ढुं… म्हणणाऱ्या शीतल म्हात्रे शिंदे गटात गेल्या तरी का?

ED नाही, काडी नाही, की बॉक्स आला नाही मग बंडखोर आमदारांना काय तो दांडा, काय ते ढुं… म्हणणाऱ्या शीतल म्हात्रे शिंदे गटात गेल्या तरी का?

| Updated on: Jul 12, 2022 | 11:49 PM

मी आमदार नाहीये मी खासदार नाहीये. मी अगदी नगरसेविका सुद्धा नाहीये मी माझी नगरसेविका आहे मला ईडी नाहीये मला काडी नाहीये मला बॉक्स नाही आहे आलेल्या मला पेटी आलेली नाहीये मला काही नाही आलेले आहे. फक्त हिंदुत्वाचे विचार हे पटलेत म्हणून शिंदे गटात सामील झालेय.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेविका शितल म्हात्रे( Sheetal Mhatre) बंडखोर शिंदे(Eknath Shinde) गटात सामील झाल्या आहेत. एकदम त्यांच मत परिवर्तन कस झालं यावर शितल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  घटना घडली तेव्हा नक्कीच मी सुद्धा जे सर्व सामान्य शिवसैनिक करतो त्या पद्धतीने वागले. आम्हाला सुद्धा वाईट वाटलं की हे कसं झालं परंतु हे कसं झालं आणि हे काय झालं हे जेव्हा आम्ही त्यांची भूमिका या सर्व आमदारांची मुख्यमंत्री साहेबांची ऐकली तेव्हा आम्हाला असं वाटलं की ही भूमिका ही प्रत्येक नगर प्रत्येक शिवसैनिकाची आहे.  प्रत्येक शिवसैनिकाला वाटते की बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणं ही प्रत्येक हिंदुत्वाची आहे. BMC मध्ये नगरसेवकांची खूप मोठ्या प्रमाणात गळचेपी होतेय.  काही मूठभर  लोक होती त्यांच्या हातात ही नगर महानगरपालिका गेली होती. मातोश्रीला सांगण्याचा प्रयत्न केला साहेबांना सांगायचा प्रयत्न केला परंतु वरिष्ठांनी कुठेतरी त्यांच्यापर्यंत आमची भूमिका पोचवलेली दिसत नाहीये आणि आज मी जे काही बोलते आहे हे प्रत्येक महानगरपालिकेतल्या शिवसेनेच्या नगरसेवकाची भूमिका आहे असं त्या म्हणाल्या.  मी आमदार नाहीये मी खासदार नाहीये. मी अगदी नगरसेविका सुद्धा नाहीये मी माझी नगरसेविका आहे मला ईडी नाहीये मला काडी नाहीये मला बॉक्स नाही आहे आलेल्या मला पेटी आलेली नाहीये मला काही नाही आलेले आहे. फक्त हिंदुत्वाचे विचार हे पटलेत आणि प्रामाणिकपणे स्वतःच्या अंगावर हे शिव धनुष्य घेणारी ही सर्व आपली मंडळी दिसली म्हणून मी शिंदे गटात सामील झाले असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.

Published on: Jul 12, 2022 11:49 PM