Special Report | समजून घ्या, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांना का भेटत आहेत?
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्यात. शिंदेंनी भेटीगाठीची सुरुवात शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकरांपासून केली..किर्तीकरांच्या घरी जाऊन शिंदेंनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर कदम, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत आहेत. अशातच शिंदेंनी त्यांच्या घरी जाऊन कदमांची भेट घेतली. कोकणातील कदमांचे अनेक समर्थक शिंदे गटात प्रवेशही करणार आहेत. बाळासाहेबांसोबत काम केलेले जेष्ठ शिवसैनिक लिलाधर डाकेंच्याही घरी एकनाथ शिंदे आले.
मुंबई : शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकरांची भेट, रामदास कदमांची भेट, लिलाधर डाकेंचीही भेट आणि नंतर मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचीही भेट. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी( Eknath Shinde), शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्यात. शिंदेंनी भेटीगाठीची सुरुवात शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकरांपासून केली..किर्तीकरांच्या घरी जाऊन शिंदेंनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर कदम, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत आहेत. अशातच शिंदेंनी त्यांच्या घरी जाऊन कदमांची भेट घेतली. कोकणातील कदमांचे अनेक समर्थक शिंदे गटात प्रवेशही करणार आहेत. बाळासाहेबांसोबत काम केलेले जेष्ठ शिवसैनिक लिलाधर डाकेंच्याही घरी एकनाथ शिंदे आले. आणि त्यांच्याही तब्येतीही विचारपूस शिंदेंनी केलीय. यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्याही घरी आले. जोशींसोबतही एकनाथ शिंदेंची बराच वेळ चर्चा झाली. शिंदेंनी आधी शिवसेनेचे 40 आमदार फोडले. त्यानंतर 12 खासदारही आपल्या गटात घेतले…आणि आता त्यांनी आपला मोर्चा जेष्ठ नेत्यांकडे वळवलाय.