माजी मुख्यमंत्र्यांना अटकेची भीती का ? भास्कर जाधव यांचा थेट सवाल कुणाला ?
त्रास देणारे जे आहेत त्यांनी के लक्षात ठेवावे की चार दिवस सासूचे असतील पण पुढील येणार दिवस हे सुनेचे आहेत एवढेच सांगतो, असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी दिला आहे.
ठाणे : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुद्द्यामहून विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे. अन्याय होत आहे. जेव्हा आम्ही कोर्टात जातो तेव्हा आम्हाला न्याय मिळतो. असा त्रास देणारे जे आहेत त्यांनी के लक्षात ठेवावे की चार दिवस सासूचे असतील पण पुढील येणार दिवस हे सुनेचे आहेत एवढेच सांगतो, असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी दिला आहे. काळ बदलणार आहे आणि तो बदलण्यासाठी फार काही दिवस नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्या टोल्याला फार महत्व देण्याची गरज नाही. ते म्हणाले होते की मला देखील अटक करणार होते. पण, त्यांनी असे काय केले होते की त्यांना अटक करण्यात येणार होती. कुठे तरी काही तरी घडलले असावे म्हणून त्यांना भीती वाटते आहे का ? त्यांच्यासारख्या माजी मुख्यमंत्र्यांना अटकेची भीती का वाटते ? त्यांना अटक करणार असे कुणी काही बोललेले नाही. पण त्यांनी स्वतःहून सांगितले. तसेच आपण काय केलं होते त्याबद्दल तुम्हला अटक होणार होती हे खरे खोटे त्यांनी महाराष्ट्राला सांगितले पाहिजे, अशी टीकाही त्यांनी फडणवीस यांच्यावर केली.