रुपाली पाटील संतापल्या? का म्हणाल्या सत्ताधारी लोकांना जशास तसे उत्तर देऊ

रुपाली पाटील संतापल्या? का म्हणाल्या सत्ताधारी लोकांना जशास तसे उत्तर देऊ

| Updated on: May 31, 2023 | 7:15 PM

आम्ही विरोधी पक्षातल्या महिला रस्त्यावर उतरून या सत्ताधारी लोकांना जशास तसे उत्तर देऊ. आता राज्यात जी परिस्थिती निर्माण होईल त्याला पोलीस, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जबाबदार असतील असा इशारा त्यांनी दिला.

पुणे : शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली. तसे काही होणार याची आम्हाला खात्री होतीच. कारण, गृहखाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी गृह खात्याला आदेश दिले असावेत की फक्त विरोधातील लोकांवर कारवाया करायच्या. सत्तेत असणाऱ्या कुणावरही कारवाई करू नका. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सातत्याने संविधानाची आणि कायद्याची तोडफोड करत आहेत अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी संजय शिरसाठ यांना मिळालेल्या क्लीनचिटवरून सत्ताधाऱ्यांवर केलीय. संजय शिरसाठ सत्ताधारी असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र, आम्ही विरोधी पक्षातल्या महिला रस्त्यावर उतरून या सत्ताधारी लोकांना जशास तसे उत्तर देऊ. आता राज्यात जी परिस्थिती निर्माण होईल त्याला पोलीस, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जबाबदार असतील असा इशाराही त्यांनी दिला. सत्ताधारी पक्षातील नेते आणि आमदार सातत्याने विरोधी पक्षातील महिलांवर बोलतात. त्यांच्या चरित्रावर बोलतात त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करतात आणि तक्रार देऊनसुद्धा सत्तेचा माज दाखवत त्या महिलांची तक्रार घेतली जात नाही. त्यामुळे आता आम्ही रस्त्यावर उतरणार असे त्या म्हणाल्या.

Published on: May 31, 2023 07:15 PM