ठाकरे बंधूना निमंत्रण का नाही? कारण सांगताना मंत्री उदय सामंत यांनी लगावला टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांना बोलविण्यात आले नव्हते. यावरून मंत्री उदय सामंत यांनी मोठे विधान केलंय.
मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रश्न सोडवले गेले आहेत असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार दोन टप्प्यामध्ये काम करत आहे. कुणीही टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहन देखील आम्ही केलंय. मराठा समाज शिस्तीने आंदोलन करत होता. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर काळे झेंडे दाखवले. गेल्या दोन तीन दिवसात विरोधकांच्या पत्रकार परिषदा अशा होत्या की सरकार गेलं. राजकारणात देखील कधी मंदी येत असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना बोलावण्यात आले नाही. काही राजकीय पक्ष आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, ज्यांना बोलवलं नाही त्यांनी याआधी मुका मोर्चा असे म्हणाले होते. त्यामुळे त्याचे त्यांनी आधी उत्तर दिलं पाहिजे. मराठा समाजाची ज्यांनी खऱ्या अर्थाने अवहेलना केली त्यांनी आधी उत्तर दिलं पाहिजे. उद्धव आणि राज यांना बोलवलं नाही. जरी बोलवलं नव्हतं तरी यांचं बोलणं वेगळं राहिलं असतं का? एखादी गोष्ट केली तर ती पटवूनच घ्यायचीच नाही असे त्यांचे धोरण आहे, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली.