राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली? मनसेची स्थापना करताना कोणता विचार डोक्यात होता?

राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली? मनसेची स्थापना करताना कोणता विचार डोक्यात होता?

| Updated on: Mar 23, 2023 | 9:06 AM

Why Raj Thackeray Left Shivsena : राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर का पडले? शिवसेनेतून बाहेर पडण्याची कारणं काय? शिवसेना सोडतानाच मनसेच्या स्थापनेचा विचार मनात होता का? असे अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत असतात. त्याचं उत्तर स्वत: राज ठाकरे यांनीच दिलंय.

मुंबई : राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडव्याच्या सभेत बोलताना शिवसेना पक्ष सोडण्याची कारण सांगितली. “आताचं सगळं राजकारण पाहिल्यानंतर टेलिव्हिजनचे सिरिजचे रिकॅप येतात. अगोदर काय झालं ते सांगतात मग पुढचा भाग दाखवतात. 2006 ला मी पक्ष स्थापन केला. मी त्या संपूर्ण भाषणात काय झालं. कशामुळे झालं तो चिखल मला करायचा नव्हता. आजही करायचा नाही. पण काही गोष्टी ज्या पसरवल्या गेल्या की राज ठाकरेला शिवसेना प्रमुख पद पाहिजे. अख्खा पक्ष पाहिजा होता. पण हे झूठ होतं. ते माझ्या स्वप्नात कधी आलं नाही. कारण तो नुसता धनुष्यबाण नव्हता तर शिवधनुष्य होता. बाळासाहेब ठाकरेंशिवाय कुणाला झेपणार नव्हता. एकाला झेपणार नाही मग दुसऱ्याला झेपेल का ते माहिती नाही”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

Published on: Mar 23, 2023 09:06 AM