फक्त मुद्द्याचं बोलूया...! रोहित पवार यांच्या हटके टी-शर्ट मागचं कारण काय? पाहा व्हिडीओ...

फक्त मुद्द्याचं बोलूया…! रोहित पवार यांच्या हटके टी-शर्ट मागचं कारण काय? पाहा व्हिडीओ…

| Updated on: Aug 02, 2023 | 1:19 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जतमधील एमआयडीसीचा मुद्दा लावून धरला आहे. विधीमंडळ अधिवेशनात त्यांनी भर पावसात उपोषणही केलं. यानंतर आज रोहित पवार विधानभवन परिसरात एका हटके टी-शर्टमध्ये दिसले. या टी-शर्टची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जतमधील एमआयडीसीचा मुद्दा लावून धरला आहे. विधीमंडळ अधिवेशनात त्यांनी भर पावसात उपोषणही केलं. यानंतर आज रोहित पवार विधानभवन परिसरात एका हटके टी-शर्टमध्ये दिसले. या टी-शर्टची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. रोहित पवार आज अधिवेशनाला दाखल झाले तेव्हा त्यांनी क्रिम कलरचं टी-शर्ट घातलं होतं. यावर कर्जत एमआयडीसीबाबत भाष्य करण्यात आलं आहे. या टी-शर्टवर समोच्या बाजूला मोठ्या अक्षरात MIDC असं लिहिण्यात आलंय. तर पाठीमागच्या बाजूला “ध्येय विकासाचं ठेवूया, वेध भविष्याचा घेऊया, युवाशक्तीला संधी देऊया, आणि फक्त मुद्दयाचं बोलूया!”, असं लिहिण्यात आलं आहे. दरम्यान हे टीशर्ट घालण्यामागचं कारण काय? यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Aug 02, 2023 01:19 PM