Ajit Pawar | आमचा चहापानावर बहिष्कार का? याबाबतच पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं : अजित पवार-TV9
यावेळी पवार यांनी अधिवेशनाच्या निमित्तानं कामकाज होत असताना आमचं स्पष्ट मत आहे की, हे शिंदे सरकार मुळातच लोकशाही आणि संसदीय परंपरेच्या चिंधड्या उडवत स्थापन झाल्याचं म्हटलं आहे.
मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन हे 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाला चहापानाच्या कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण दिले आहे. मात्र या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय पार पडलेल्या बैठकीत घेतला आहे. त्याप्रमाणे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. तसेच या पत्रकार परिषद हिष्कार टाकण्याचा निर्णय का घेण्यात आला याची कारणेही सांगितली. यावेळी पवार यांनी अधिवेशनाच्या निमित्तानं कामकाज होत असताना आमचं स्पष्ट मत आहे की, हे शिंदे सरकार मुळातच लोकशाही आणि संसदीय परंपरेच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं आहे. अजूनही हे सरकार विधीमान्य नाही. अजूनही सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे हे अधिवेशन फार कमी काळाचं आहे. त्याचा कालावधी वाढवण्याबाबत सांगितल्याची माहितीही पवार यांनी दिली.