MVA : ‘त्या’ घोषणाबाजीचे धाडस कशामुळे? विखे-पाटलांचा निशाणा कुणावर?
केरळ, राज्यस्थानमध्ये या संघटनांना तेथील राज्य सरकारचा आश्रय होता. पण हे लोण महाराष्ट्रात कसे पसरले यावर देखील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी खळबळजनक विधान केले आहे.
योगेश बोरसे टीव्ही 9 पुणे : ‘पीएफआय’ (PFI) च्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात केलेल्या घोषणेबाजीचा तीव्र निषेध राज्यभर होत आहे. एनआयए च्या कारवाईनंतर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी चौकशीही केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले आहे. असे असतानाच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी खळबळजनक विधान केले आहे. पीएफआय सारख्या संघटना ह्या महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) काळातच अधिक फोफावल्या. त्यामुळेच त्यांचे हे धाडस वाढले आहे. केरळ, राज्यस्थानमध्ये या संघटनांना तेथील राज्य सरकारचा आश्रय होता. पण महाराष्ट्रात ते मविआ सरकारच्या काळात अधिक फोफावले आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता चौकशीचे आदेश दिल्याने सर्वकाही समोर येईल असा दावा विखे-पाटील यांनी केला आहे. देशभक्ती आणि देव भक्तांवरच महाविकास आघाडी सरकारच्या काळात कारवाई झाल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.