कोकणातल्या कोंबड्याची तडफड म्हणत राणेंवर कुणाची टिका
राज्यात भाजपाचे सरकार आल्यावर सर्व रोजगार गुजरातला गेले. टेंडर, रस्त्याची कामे आदि सर्व टेंडर गुजरातला गेले. त्यांच्याकडून नितेश राणेला माल भेटत आहे म्हणून...
सोलापुर | ८ ऑगस्ट २०२३ : आदित्य ठाकरे यांनी टोल बंद करा म्हटल्यावर भाजपाचे दोन नंबर धंदेवाले कॉन्ट्रॅक्टर यांच्या पोटावर पाय पडेल म्हणून कोकणातल्या कोंबड्याची सध्या तडफड सुरू आहे, असा टोला युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी नितेश राणे यांना लगावला आहे. राज्यात भाजपाचे सरकार आल्यावर सर्व रोजगार गुजरातला गेले. टेंडर, रस्त्याची कामे आदि सर्व टेंडर गुजरातला गेले. त्यांच्याकडून नितेश राणेला माल भेटत आहे म्हणून त्यांची बोंबाबोंब होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. सर्व विषारी साप हे राणे यांच्या घराच्याच परिसरात आहेत. महाराष्ट्रात सगळ्यात टाकून दिलेले कोणी असेल तर ते राणे कुटुंबीय आहेत. त्यामुळे तुमच्याच घरी विषारी साप आहे तुम्ही दुसऱ्याकडे बोट करू नका असा टोलाही त्यांनी लगावला.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या

नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया

तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
