…म्हणून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली; किशोरी पेडणेकरांचा खुलासा
शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार? शिंदे गटाचा की शिवसेनेचा यावरून राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. आता महापालिकेकडून दोन्ही गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.
मुंबई : शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार? शिंदे गटाचा की शिवसेनेचा यावरून राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. आता महापालिकेकडून दोन्ही गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावरून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंकडून रडीचा आणि कळीचा डाव सुरू आहे. शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात त्यांनी खोडा घातला. मात्र जनता याला फसणार नाही, असा घणाघात पेडणेकरांनी केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गट हीच खरी शिवसेना असून, त्यांचा दसरा मेळावा होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी केला आहे.
Published on: Sep 22, 2022 11:31 AM
Latest Videos