अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?

अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?

| Updated on: Oct 16, 2024 | 4:39 PM

आपली आणि शरद पवार साहेबांची भेट झालेली नाही.आपण केवळ जयंत पाटलांना भेटल्याचे यावेळी राजेद्र शिंगणे यांनी सांगितले. जायचं तर उघडपणे जाईल, चेहऱ्यावर फाईल लपवून जाणार नाही, त्या दिवशी सुप्रिया सुळे यांच्या गाडीत मी नव्हतोच असाही खुलासा शिंगणे यांनी केला आहे.

आपण सध्या अजित पवार यांच्या गटात असलो तरी आपण आगामी निवडणूक शरद पवार गटातून लढवावी अशी आपल्या 99 टक्के कार्यकर्त्यांची भूमिका आहे असे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे. आज मी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे. पुढील दोन दिवस आपण जिल्ह्यात फिरुन सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करु असेही आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे.गेल्या महिनाभरापासून अजितदादांशी आपली भेट किंवा बोलणे झालेले नसल्याचेही त्यांनी सांगितले. सिद्धखेड राजा मतदार संघातील अनेक जाती आणि पंथाची जनता आहे.यांच्या सव्वा वर्षे झालेल्या चर्चेतून मी शरद पवार यांच्या बरोबर जावे अशी सामान्य कार्यकर्त्यांची भावना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 1995 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलो होतो. राष्ट्रवादी पक्ष 1999 साली स्थापन झाल्यानंतर मी शरद पवार यांच्या बरोबर गेल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी सांगितले आहे.

Published on: Oct 16, 2024 04:38 PM