वेळ द्यायला तयार पण आधी याची उत्तरे द्या, मनोज जरांगे यांचे ते चार प्रश्न कोणते?

वेळ द्यायला तयार पण आधी याची उत्तरे द्या, मनोज जरांगे यांचे ते चार प्रश्न कोणते?

| Updated on: Nov 01, 2023 | 11:29 PM

आमदार बच्चु कडू यांनी जालना येथे मनोज ज्रांगे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी जरांगे पाटील यांनी आम्हाला वाटलं तर सरकारला आणखी वेळ वाढवून देऊ असं महत्वाचं विधान केलंय. मात्र, तुम्हाला वेळ का वाढवून द्यावा यासाठी त्यांनी सरकारला चार प्रश्न केले आहेत.

जालना | 1 नोव्हेंबर 2023 : एक तासापासून पाणी सोडलं आहे. आता आऱक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नाही. उलट केसेस केल्यामुळे सरकारवर रोषविषयी रोष निर्माण झालाय. जाणुनबुजुन सरकार आपल्या भावांना गुंतवण्याचा प्रयत्न. खोटे गुन्हे दाखल करत आहे. मी माघार घेणार नसतो. सगळे पुरावे आहेत तरीही सरकार आऱक्षण देत नाही. आम्हाला येथे लढावं लागेल. अधिकारी शहाणे असाल तर आपल्या बांधवावर मराठ्यांवर गुन्हे दाखल करू नका. सरकारने त्यांची भूमिका घेतलेली आहे. इकडं माणसं मरायला लागली आणि सरकार किती बैठका घेतात? सरकारनं वातावरण दूषित करायचं ठरवलं आहे. आता सांगू शकतं नाही. कधीपर्यंत माणसं मरायला लागत आम्हाला वाटलं तर सरकारला वेळ देऊ. पण येथे येवून सरकारनं बोलावं असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Published on: Nov 01, 2023 11:29 PM