कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील
मनसेचे कल्याण येथील आमदार राजू पाटील हे यंदा लोकसभा निवडणूक लढवणार का ? अशी चर्चा सुरु आहे. येथे आगरी मतांचे प्रमाण जास्त असल्याने मनसेच्यावतीने राजू पाटील यांनी संधी दिली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतू राजू पाटील यांनी मात्र पक्ष जो निर्णय घेईल त्याला साथ देऊ असे म्हटले आहे.
डोंबिवली | 4 मार्च 2024 : कल्याण लोकसभा मतदार संघात यंदा मोठी चुरस निर्माण होणार आहे. हा मतदार संघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला होता. आता येथून एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. या मतदार संघातून यंदा मनसेच्यावतीने राजू पाटील यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे. या संदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील यांना विचारले असता त्यांनी याबाबत पक्ष नेतृत्व अंतिम निर्णय घेईल असे म्हटले आहे. भाजपा नेते आशीष शेलार यांनी मध्यंतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर मनसे भाजपाची युती होणार का ? असा सवाल केला जात होता. मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत मनसे आणि आमची विचारधारा जुळणारी असल्याचे म्हटले होते आणि भविष्यात एकत्र येऊ शकतो असे संकेत दिले होते. यावर आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट काही सांगितले नाही. परंतू लोकसभेसाठी पोषक वातावरण असेल तर पक्ष योग्य निर्णय घेईल असे म्हणत चेंडू पक्ष श्रेष्टीच्या कोर्टात टाकला आहे.