अजित पवार यांच्या बंडानंतर उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार? आता टाळी कोण देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट…
अजित पवार यांच्या भूकंपानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचे बॅनर्सही अनेक ठिकाणी लागले. अशातच गुरुवारी राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसेच्या वतीने ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव देण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात कधी, कोण एकत्र येतील याचा काही नेम नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूकंपानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचे बॅनर्सही अनेक ठिकाणी लागले. अशातच गुरुवारी राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसेच्या वतीने ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव देण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र आपण कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचं पानसे म्हणाले. ठाकरे गटाच्या नेत्यांनीही युतीच्या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका मांडल्या आहेत. विशेष म्हणजे याआधीही राज ठाकरे यांनी युतीचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना पाठवला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी सात कॉल्स करूनही उचलले नव्हते, असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार की नाहीत, यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…