ठाकरे घराण्यातल्या आणखी एका धडाडत्या तोफेची राजकारणात एन्ट्री? ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण!
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या ट्विटमुळे ठाकरे घराण्यातील आणखी एका धडाडत्या तोफेची राजकारणात एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
मुंबई, 7 ऑगस्ट 2023 | महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तेजस ठाकरे यांचा आज 27 वा वाढदिवस आहे. यानिमत्त शिवसैनिकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशातच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही तेजस ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. किशोरी पेडणेकर यांनी ट्वीट करत तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Aug 07, 2023 03:16 PM
Latest Videos