ओबीसी विरोध मराठा वाद पेटणार का? कोण आहे यामागील कळीचा नारद?
मराठा आरक्षणावरून काँग्रेस आणि भाजपचीही भूमिका काय आहे? काँग्रेस म्हणते की, मूळ ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका. आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसींचा 19 टक्क्यांचा कोटा वाढवा. तर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणच नको असे म्हणताहेत....
मुंबई : 6 सप्टेंबर 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या मराठ्यांच्या निझामकालीन नोंदी कुणबी अशा सापडतील त्यांना कुणबीचं जातप्रमाणपत्र देऊ अशी घोषणा केली. मात्र, ओबीसीतून आरक्षण द्यायचं असल्यास कोटा वाढवा. नाही तर रस्त्यावर उतरु असा इशारा ओबीसी महासंघाने दिला. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबीचे जात प्रमाणपत्र द्या, अशी मागणी उपोषणकर्ते जरांगे पाटील यांची आहे. अर्थात कुणबीचे जात प्रमाणपत्र मिळालं तर त्यांना OBC तून आरक्षण मिळेल. मात्र, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर ओबीसी नेत्यांनी त्याला विरोध केला. मनोज जरांगे यांच्या दबावात येऊन मराठ्यांना कुणबीचं जातप्रमाणपत्र दिल्यास रस्त्यावर उतरु असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघ अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला. तर, ओबीसी बांधव आणि आपण समन्वयानं घेऊ. नेतेच ओबीसी- मराठ्यांची झुंज लावत आहेत असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. नेमके हे नेते कोण आहेत यावर पहा हा स्पेशल रिपोर्ट