नाराज असण्याच कारणच नाही, याच्याआधीच स्पष्टीकरण दिल आहे; कोल्हे यांचे नाराजी नाट्यावर स्पष्टीकरण
कोल्हे यांनी, मी नाराज नाही. यावर माझ्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील स्पष्टीकरण दिल आहे. पक्षाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्यामुळे ही चर्चा होते. त्यानंतरच अशा बातम्या येतात. मात्र ही ही वस्तुस्थिती नाही. मी बिलकूल नाराज नाही
कराड (सातारा) : राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीत अस्वस्थ असून ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगत असतात. त्याबाबत आधीमधी बातम्या ही येत असतात. यावरूनच विचारलेल्या प्रश्नाला कोल्हे यांनी थेट उत्तर दिलं आहे. कोल्हे यांनी, मी नाराज नाही. यावर माझ्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील स्पष्टीकरण दिल आहे. पक्षाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्यामुळे ही चर्चा होते. त्यानंतरच अशा बातम्या येतात. मात्र ही ही वस्तुस्थिती नाही. मी बिलकूल नाराज नाही. खासदार म्हणून काम करत असताना 100 दिवस मी दिल्लीत असतो. आणि अभिनेता म्हणून काम करत असताना पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थिती नसते. त्यावरून अशा चर्चा सुरू होतात. नाराजीच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. नाराज असण्याच कारणच नाही, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. त्यामुळे अमोल कोल्हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.