वाकून बघताना तोल गेला, महिला समुद्रात पडली, 50 वर्षीय फोटोग्राफरने जीवाच्या बाजीने वाचवलं
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया परिसरात मोठी दुर्घटना टळली. समुद्रात वाकून पाहताना एका महिलेचा तोल गेला आणि ती समुद्रात पडली. मात्र या बुडणाऱ्या महिलेला वाचवण्यात यश आलं आहे.
मुंबई : मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया परिसरात मोठी दुर्घटना टळली. समुद्रात वाकून पाहताना एका महिलेचा तोल गेला आणि ती समुद्रात पडली. मात्र या बुडणाऱ्या महिलेला वाचवण्यात यश आलं आहे. या महिलेचा जीव वाचवण्यासाठी एका 50 वर्षीय व्यक्तीने थेट समुद्रात उडी टाकली. हा व्यक्ती गेटवेवर फोटो काढण्याचे काम करतो. गुलीबचंद गोंड असं त्याचं नाव आहे.
महिला समुद्रात पडल्यानंतर, गुलीबचंद गोंड यांनीही पाण्यात उडी मारली. त्यानंतर नागरिकांनी रस्सी आणि ट्यूब फेकली. ती ट्यूब गुलीबचंद यांनी महिलेला दिली आणि दोरीच्या सहाय्याने आधार दिला. त्यामुळे या महिलेचा जीव वाचला आहे.
Latest Videos