16 आमदार अपात्रेच्या मुद्द्यावरून ठाकरे अन् शिंदे गटातील नेत्यांमध्ये जुगलबंदी, पाहा कोणी काय वक्तव्य केलं?
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना नोटीस बजावली होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आज आमने-सामने आल्याचे दिसले.
मुंबई, 19 जुलै 2023 | शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना नोटीस बजावली होती. त्यानंतर ठाकरे गटाने आम्ही विधानसभा अध्यक्षांना उत्तर देणार नाही असं सांगितलं. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आमने-सामने आल्याचे दिसले. यावेळी दोघांच्याकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले. नेमकं काय घडलं यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…
Published on: Jul 19, 2023 02:05 PM
Latest Videos