पुण्यात पाणीबाणी, मध्यवर्ती भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत; काय कारण?

| Updated on: Jan 08, 2024 | 6:34 PM

नव्या जलवाहिनींचे काम सुरू असल्याने शहरातला पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणीबाणीची समस्या ओढावणार आहे. पुणे शहरात आजपासून 22 जानेवारीपर्यंत नव्या जलवाहिन्यांचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे पुण्यात काही भागात पाणी कपातची समस्या

पुणे, ८ जानेवारी २०२४ : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. पुण्यात आजपासून शहरातील अनेक भागात केवळ एक वेळ पाणी सोडण्यात येणार आहे. तर शहरातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगितले जात आहे. नव्या जलवाहिनींचे काम सुरू असल्याने शहरातला पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणीबाणीची समस्या ओढावणार आहे. पुणे शहरात आजपासून 22 जानेवारीपर्यंत नव्या जलवाहिन्यांचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे पुण्यात काही भागात पाणी कपातची समस्या निर्माण होणार आहे. पुण्यातील पर्वती जलकेंद्रांपासून अनेक नव्या जलवाहिन्या सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामांसाठीच पुणे शहरातील मुख्य पेठांमध्ये देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

Published on: Jan 08, 2024 06:34 PM
प्रत्येकाला मन मोकळं करण्याचा अधिकार, अजित पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचं खोचक प्रत्युत्तर
Boycott Maldives : पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपचं ट्वीट केलं अन् मालदिवला झोंबलं, पण का?