किती टक्के स्त्रियांना करावा लागतो 'बॅड टच'चा सामना? महिला दिनी महत्वाचा सर्व्हे समोर

किती टक्के स्त्रियांना करावा लागतो ‘बॅड टच’चा सामना? महिला दिनी महत्वाचा सर्व्हे समोर

| Updated on: Mar 08, 2023 | 12:40 PM

सार्वजनिक ठिकाणी मुली सर्वात जास्त असुरक्षित वाटल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे. बलात्कारानंतर कोणत्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला जातो, याची माहिती नव्या पिढीत 58.7 टक्के आणि जुन्या पिढीतील 58.8 टक्के महिलांना नाही, असं या सर्व्हेतून समोर आलं आहे.

Womens Day 2023 : आज जागतिक महिला दिन आहे. या महिलानिमित्त महिला सुरक्षेबाबतचा एक सर्व्हे समोर आला आहे. वूई फॉर चेंज या संस्थेच्या वतीने हा सर्व्हे करण्यात आला आहे. राज्यभरात 60 टक्के महिलांना ‘बॅड टच’ चा सामना करावा लागतो. ‘वूई फॉर चेंज’ या संस्थेच्या सर्वेक्षणा ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सुरक्षेचा आरसा दाखवणारा हा सर्व्हे आहे. 67.5 टक्के ज्येष्ठ वयोगटातील महिलांनीही पुरुषांनी नकोसा स्पर्श केल्याची तक्रार नोंदवली आहे. ‘वूई फॉर चेंज’ने 18 ते 25 आणि 25 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिलांचा अभ्यास केला. अभ्यासात 18 वर्षे वयापासून तर 60 वर्षे वयोगटातील महिला सहभागी झाल्या. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील महिला या सर्वेक्षणात सहभागी होत्या. याबाबतची माहिती वूई फॉर चेंज संस्थेच्या संस्थापक रश्मी सोवणी यांनी दिली आहे.

Published on: Mar 08, 2023 12:40 PM