वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा...

वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा…

| Updated on: Nov 09, 2024 | 12:58 PM

वरळीच्या समस्या मांडण्यासाठी आम्ही दोघे आहोत. बीडीडी चाळीचा क्लस्टरचा प्रश्न सोडववण्यात आदित्य ठाकरे यांनी प्रयत्न केलेले आहेत. वरळी कोळीवाड्यासारख्या गावठाणांचा विकास लोकांच्या इच्छेनुसार केला जाणार आहे असे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी म्हटले आहे.

वरळी विधानसभा निवडणूकीत तिरंगी निवडणूक होणार आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे पूत्र निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या विरोधात मनसेचे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढवित आहेत. तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा देखील येथून उभे आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. या संदर्भात शिवसेना गटाचे नेते सचिन अहिर यांनी मात्र ही निवडणूक वन साईड होणार असल्याचा दावा केला आहे. या ठिकाणचे दोन उमेदवार असले तर दोघांचा आधी पराभव झालेला आहे.संदीप देशपांडे यांचा प्रभादेवीतून पराभव झालेला आहे. तर मिलिंद देवरा यांचा देखील पराभव झालेला आहे. राज ठाकरे यांचा भोंगा निवडणूकीला चालतो. रोज कपडे बदलतात त्यांच्याविषयी काय बोलायचे ? आदित्य ठाकरे यांनी वरळीच्या बीडीडी चाळींच्या क्लस्टरचा प्रश्न लावून धरलेला आहे. सत्ताधारी विकासाची गोष्टी सांगत नाहीत. ज्यावेळी भाजपा निवडणूक हरतात त्यावेळी त्यांना सामाजिक ध्रुवीकरणाचा आधार घ्यावा लागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच होतील असा दावा सचिन अहिर यांनी केला आहे.

 

Published on: Nov 09, 2024 12:54 PM