कोल्हापुरात येणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांना महिला कार्यकर्त्यांचा विरोध; काय आहे कारण?
याचदरम्यान कोल्हापुरात होऊ घातलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वादाचे ग्रहण लागले आहे. स्पर्धेच्या निमित्ताने कोल्हापुरात येणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांना राजमाता जिजाऊ संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी इशारा देत विरोध केला आहे.
कोल्हापूर : लैगिंक शोषण केल्याप्रकरणी भारतातील कुस्तीपटूंनी रेस्टलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाईसाठी कुस्तीपटूंकडून पुन्हा आंदोलन केले जात आहे. कुस्तीपटूंकडून दिल्लीमधील जंतर मंतरवर बेमुदत धरणे आंदोलन केले जात आहे. परिणामी हा मुद्दा देशपातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. याचदरम्यान कोल्हापुरात होऊ घातलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वादाचे ग्रहण लागले आहे. स्पर्धेच्या निमित्ताने कोल्हापुरात येणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांना राजमाता जिजाऊ संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी इशारा देत विरोध केला आहे. आज होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बृजभूषण सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर त्यांच्या स्वागतासाठी शहर भर पोस्टर लावले गेले आहेत. आता त्यावरूनही टीका होताना दिसत आहे. तर ब्रूजभूषण सिंह कोल्हापुरात आल्यास त्यांना काळे झेंडे दाखवणार असा पवित्रा राजमाता जिजाऊ संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी घेतला आहे.