आता लाल माती, मॅट नाही तर जंतरमंतरवर पैलवानांनी ठोकला शड्डू, काय आहे कारण जाणून घ्या…
बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी याआधीही करताना पैलवानांनी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे जानेवारी महिन्यात आंदोलन केले होते. यानंतर आता पुन्हा एकदा महिला पैलवानांनी सिंह यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे कुस्तीपटू पुन्हा एकदा एकवटले आहेत
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर देशातील स्टार महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावर बजरंग पुनिया, महिला पैलवान विनेश फोगाट यांच्यासह अनेक पैलवानांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी याआधीही करताना पैलवानांनी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे जानेवारी महिन्यात आंदोलन केले होते. यानंतर आता पुन्हा एकदा महिला पैलवानांनी सिंह यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे कुस्तीपटू पुन्हा एकदा एकवटले आहेत. यादरम्यान विनेश फोगट यांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत येथेच राहून जंतरमंतरवर आमरण उपोषण करणार असल्याचे म्हटलं आहे. त्यामुले एकच खळबळ उडाली आहे. या आंदोलनात बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट आणि इतर स्टार कुस्तीपटू रविवारी संध्याकाळपासून जंतरमंतरवर बसून विरोध करत आहेत.