“राष्ट्रवादीकडून तेरी भी चूप, मेरी भी चूप भूमिका”, निधी वाटपावरून यशोमती ठाकूर यांची टीका
अजित पवार हे अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांना निधी वाटप केला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना तर भरभरून निधी दिला आहे. यावरून काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.
मुंबई, 25 जुलै 2023 |अजित पवार हे अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांना निधी वाटप केला आहे. यावेळी काही आमदारांना त्यांनी भरभरून निधी दिला आहे. तर काहींना मिळालेला नाही. त्यामुळे निधी वाटपाच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना भरभरून निधी दिल्यामुळे काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, “अजित पवारांनी मला तुटपुंजा निधी दिला आहे. परंतु राष्ट्रवादीचे जे नेते तेरी भी चूप मेरी भी चूप या भुमिकेत असतील तर त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी. ते इथे आहेत की तिथे हे सांगावे.”
Published on: Jul 25, 2023 01:35 PM
Latest Videos