‘कहाण्या काढायच्या स्टोरीज काढायच्या आणि मग सत्तेत बसायचं’; यशोमती ठाकूर यांची कोणावर टीका

‘कहाण्या काढायच्या स्टोरीज काढायच्या आणि मग सत्तेत बसायचं’; यशोमती ठाकूर यांची कोणावर टीका

| Updated on: Jul 17, 2023 | 1:33 PM

आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधाकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. यावेळी काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी, सरकारवर हल्लाबोल करताना टीकेची झोड उडवली.

मुंबई, 17 जुलै 2023 | शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरूवात झाली. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधाकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. यावेळी काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी, सरकारवर हल्लाबोल करताना टीकेची झोड उडवली. तसेच यावेळी त्यांनी शिंदे गटासह राष्ट्रवादीत फूट पाडून गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या गटावर देखील टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी यशोमती ठाकूर यांनी, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे अतिशय धक्कादायक आहे. रिजनल पार्टीजला तोडफोड केलं जात असल्याची टीका केली आहे. तर हे संविधानाला मानणाऱ्या व्यक्तीला आणि महाराष्ट्राच्या जनतेला देखील न पटणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर अदाणीला धारावी मिळते पण शेतकऱ्यांना काय मिळतं? सर्व्हर तर इतका स्लो चालतो की बिचारे युवक घाबरले आहेत. तर ज्या मराठा समाजाच राजकारण हे करत आहेत. जो तरूण मराठा समाजासाठी आंदोलन करत, जे मेटे साहेब वारले त्यावर कोणी बोलत नाहीये. फक्त स्वतःपुरतं राजकारण आणि स्वतःसाठीच राजकारण असं केलं जात आहे. तर काही लोकांनी काही कहाण्या काढाल्या स्टोरीज केल्या आणि तेच आज विरोधी बाकावरून सत्तेत जाऊन बसायचं हे न पटणार आणि वेदनादायक असल्याचं देखील यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 17, 2023 01:33 PM