भावाच्या नात्यानं ओवाळणी देतो, अजितदादांच्या विधानावर यशोमती ठाकूर म्हणाल्या, सावत्र भावासारखा…

भावाच्या नात्यानं ओवाळणी देतो”, अजितदादांच्या विधानावर यशोमती ठाकूर म्हणाल्या, “सावत्र भावासारखा…”

| Updated on: Jul 26, 2023 | 8:31 AM

निधी वाटपावरून काल सभागृहात गदारोळ माजला. विरोधक आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या खडाजंगी पाहायला मिळाली. यशोमती ठाकूर यांना उत्तर देताना मला सावत्र भाऊच्या चष्म्यातून बघू नका, भावाच्या नात्याने ओवाळणी देतो, असं अजित पवार म्हणाले. यावर आता यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 26 जुलै 2023 | निधी वाटपावरून काल विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. निधी वाटपाबाबत अजित पवार निवेदन देत असताना काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी निधी वाटपावरुन आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर मला सावत्र भाऊच्या चष्म्यातून बघू नका, भावाच्या नात्याने ओवाळणी देतो, असं अजित पवार म्हणाले. तर यानंतर यशोमती ठाकूर या सभागृहाच्या बाहेर आल्या. त्यांनी विधान भवनात यावर प्रतिक्रिया दिली आहे. “बहीण-भावाचं नातं हे अतिशय पवित्र नातं असतं. आम्ही जेव्हापासून राजकारणात आलो तेव्हापासून अजित दादांना आम्ही दादा म्हणूनच बघतोय. भाऊ म्हणूनच बघतोय. 15 दिवसांत भाऊ दुसऱ्या बाकांवर जाऊन बसला आणि सावत्र भावासारखा वागला तर ते वेदनादाकच आहे ना”, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Published on: Jul 26, 2023 08:31 AM