“राणा दाम्पत्याने खुद्द के गिरेबान मे झाकं के देखना चाहिये”, काँग्रेसच्या महिल्या नेत्याची टीका
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. राणा समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणा जवळच काही अंतरावर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमरावती : आज उद्धव ठाकरे अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. राणा समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणा जवळच काही अंतरावर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “खरं तर हे राणा दाम्पत्याला आम्हीच निवडून आणलं आहे, राणा दाम्पत्याने खुद्द के गिरेबान मे झाक के देखना चाहीये. जे स्वतः दलबदलु आहेत, स्वतः गोंधळ घालतात ती व्यक्ती कोणाचा मानसन्मान करेल.अमरावती जिल्ह्यातील राजकारणात विचित्र वातावरण झाले आहे. इथे उद्योग यायला तयार नाही आहेत. या जिल्ह्याला बदनाम केलं आहे. अशी संस्कृती अमरावती जिल्ह्याची नाही. हे लोक संविधान न मानानरी लोक आहेत. जिधर बम उधर हम असा विषय आहे आजचा,” असं यशोमती ठाकूर म्हणाले.