आज महाराष्ट्रच नव्हे तर… गरज; पुण्यात राजीनाम्या पाठोपाठ काय झालं सुरू?
राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकारी कार्यकर्त्ये त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत. तर शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, यासाठी राज्यात राजीनामा सत्र सुरु असतानाच आता पुण्यात बॅनर लावले जात आहेत.
मुंबई : येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात (Yashwantrao Chavan Foundation Auditorium) शरद पवारांनी एक मोठी घोषणा केली. त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहोत, अशी घोषणा केली. आणि उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला. शरद पवार (Sharad Pawar) आपला निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत सभागृह सोडणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. त्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहे. राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकारी कार्यकर्त्ये त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत. तर शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, यासाठी राज्यात राजीनामा सत्र सुरु असतानाच आता पुण्यात बॅनर लावले जात आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP Youth Congress) कार्यकर्त्यांना बॅनर लावले आहेत. ज्यावर पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा उल्लेख आहे.