यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धिंगाणा; शेतकरी पुन्हा अडचणीत
यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवण्यात आलेला शेतमाल अवकाळी पावसात भिजला आहे.
यवतमाळ : जिल्ह्याला मंगळवारी अवकाळी पावसाने झोडपले. या पावसाने जिल्ह्यात धिंगाणा घातला असून, शेतकर्यांच्या फळबागासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जो माल विक्रीसाठी पाठवला होता तो भिजून त्याचे ही नुकसान झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवण्यात आलेला शेतमाल अवकाळी पावसात भिजला आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेले सोयाबीन आणि चना हे अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडला. बाजार समितीत सध्या खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील शेतकऱ्याचा माल आहे. अशातच शेतकऱ्याचं शेतमाल ओला झाल्याने मोठं नुकसान झालं आहे.
Published on: Apr 26, 2023 09:16 AM
Latest Videos