ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
राज्यात निवडणूकांचे बिगुल वाजले आहे.येत्या 20 नोव्हेंबर निवडणूका होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने अजून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. येत्या एक-दोन दिवसांत दोन्हींकडून याद्या जाहीर केल्या जातीत असे म्हटले जात आहे.
राज्यात विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी निवडणूका आहेत. या निवडणूका दोन पक्षांच्या फूटीनंतर होणार आहेत. या निवडणूकांच्या तारखा जाहीर होण्याआधी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर एजिओप्लास्टी करण्यात आली होती. यावरुन आता शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटात गेलेले नेते रामदास कदम यांचे पूत्र योगेश कदम यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे वैयक्तिक आजारपणाचे राजकारणासाठी आणि सुहानुभूती मिळविण्यासाठी वापर करीत आहेत. कारण शिवसैनिक हे भावनिक आणि साधे भोळे आहेत. मी एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलो तेव्हा वर्षावर गेलो असताना त्यांच्या गळ्याला त्यांनी पट्टा लावला नव्हता, मात्र ज्यावेळी त्यांना जेव्हा राजीनामा दिला तेव्हा मात्र दोन दिवस गळ्याला पट्टा लावला होता असे योगेश कदम यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी शिवसेना संपविण्यात हात भार लावला आहे. आता पवारांनी उद्धव ठाकरे यांचा वापर करुन घेतला आहे,आता ते त्यांना मुख्यमंत्री करणार नाहीत. आता शिवसेना शंभर टक्के संपून टाकतील असाही आरोप योगेश कदम यांनी केला. आपण आमदारकीचा अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजितददा आणि रामदास आठवले हे उपस्थिती असतील अशी आपली इच्छा आहे असेही योगेश कदम यांनी म्हटले आहे.