असा रेडा कधी पाहीला नसेल, रोजचा खुराक ऐकाल तर चाटच पडाल
तुम्ही प्राण्याचे लाड करणारे अनेक जण पाहीले असतील. परंतू एका रेड्याचा पालनपोषण करण्यासाठी रोज होणारा खर्च पाहून तुम्हाला गरगरायला होईल. हा रेडा केवळ नावाचा युवराज नसून त्याचा थाटबाट एखाद्या युवाराजाप्रमाणेच आहे. रोजची मालिश, सैरसपाटा आणि त्याची बडदास्त पाहून तुम्हाला आश्चर्चचकीत व्हायला होईल.
बुलढाणा | 28 जानेवारी 2024 : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील कृषी महोत्सवात एक रेडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या दोन वर्षांच्या या मस्तवाल रेड्याचे वजनच तब्बल 900 किलो इतके आहे. नुकताच नोव्हेबर महिन्यात त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला होता. या रेड्याचं नाव ‘युवराज’ असून त्याचा थाटमाट पहाण्यासारखा आहे. एका माणसाला त्याच्या दिमतीला जुंपण्यात आले आहे. या रेड्याच्या मालकाच्या फार्म हाऊसवर झाला आहे. त्याची आईचाही एक विक्रम आहे. त्याची आई दिवसाला 18 हून अधिक लिटर दूध द्यायची असे याच्या मालकाने सांगितले. या रेड्याचा दिवसाचा खुरा ऐकूनच तुम्हाला गरगरायला होईल. या रेड्यासाठी दररोज दहा लिटर दूध, दहा किलो ढेप, एक किलो सफरचंद आणि दोन किलो उंडा असा भरपेट आहार लागतो. रोजच्या आहाराचा खर्च एक हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याला रोज दोन किलोमीटर फिरायला नेले जाते. त्याची दिवसातून दोनदा मालिश केली जाते. त्याला पिण्यासाठी अतिशय स्वच्छ पाणी दिले जाते. त्याची आई अठराहून अधिक लिटर दूध द्यायची असे त्याचे मालक अभिमानाने सांगतात.