माथेफिरू तरुणाचा एक फोन अन् पोलिसांची धावपळ, कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?

माथेफिरू तरुणाचा एक फोन अन् पोलिसांची धावपळ, कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?

| Updated on: Sep 19, 2022 | 8:13 AM

कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने पोलिसांना फोन करून दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. अखेर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.

कल्याण :  कल्याणमधून (kalyan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने पोलिसांना (Police) फोन करून बाजारपेठेत असलेल्या कचराकुंडीत बॉम्ब असल्याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र त्यांना तिथे कुठेही बॉम्ब आढळून आला नाही. अखेर पोलिसांनी या तरुणाचा कॉल ट्रेस करून त्याला अटक केली. बॉम्बची माहिती मिळाल्यावर पोलीस काय करतात? हे पहाण्यासाठी या तरुणाने पोलिसांना फेक कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. या कॉलमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. अखेर पोलिसांनी या तरुणाचा शोध घेऊन त्याला अटक केली.

 

 

Published on: Sep 19, 2022 08:12 AM