Aurangabad : पुराच्या पाण्यात वाहून गेला तरुण, दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह

Aurangabad : पुराच्या पाण्यात वाहून गेला तरुण, दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह

| Updated on: Aug 06, 2022 | 11:06 AM

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. याच पुरात तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील बाजार सावंगीमधून समोर आली आहे.  हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. याच पुरात तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील बाजार सावंगीमधून समोर आली आहे.  हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या तरुणाचा शोध घेण्यात आला मात्र त्यात यश आले नाही. अखेर दुसऱ्या दिवशी या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Published on: Aug 06, 2022 11:06 AM