‘अटक करा, अटक करा, भिडे गुरुजींना अटक करा’, पुण्यात काँग्रेसचं आंदोलन
पुण्यात आज संभाजी भिडे यांच्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात संभाजी भिडे यांच्याविरोधात युवक काँग्रेस आंदोलन करत आहे. संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवक आणि विद्यार्थी काँग्रेस करत आहे.
पुणे, 31 जुलै 2023 | संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरातून निषेध व्यक्त जत आहे. काँग्रेस आणि आंबेडकरवादी संघटनांनी भिडे यांच्या निषेधार्थ निदर्शनेही केली आहेत.पुण्यात आज संभाजी भिडे यांच्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात संभाजी भिडे यांच्याविरोधात युवक काँग्रेस आंदोलन करत आहे. संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवक आणि विद्यार्थी काँग्रेस करत आहे.
Published on: Jul 31, 2023 11:50 AM
Latest Videos