Ulhasnagar Yuva Sena | उल्हासनगरातील युवासेना पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटाला पाठिंबा

| Updated on: Sep 10, 2022 | 9:55 PM

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या युवा नेतृत्त्वावर विश्वास ठेवून आपण शिंदे गटाला पाठींबा दिला असून आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचं यावेळी युवा सेना शहरप्रमुख सुशील पवार यांनी सांगितलं.

उल्हासनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर उल्हासनगर शहरात शहरप्रमुख शिंदेंसोबत न गेल्यानं उल्हासनगरातील शिवसेनेतही दोन गट पडले होते. मात्र आता युवा सेनेचे शहरप्रमुख सुशील पवार यांनी शिंदे गटाला पाठींबा दिला आहे. पवार यांच्यासोबत उल्हासनगरातील युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुद्धा शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. वर्षा बंगल्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला आपला पाठींबा जाहीर केला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या युवा नेतृत्त्वावर विश्वास ठेवून आपण शिंदे गटाला पाठींबा दिला असून आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचं यावेळी युवा सेना शहरप्रमुख सुशील पवार यांनी सांगितलं.

Published on: Sep 10, 2022 09:55 PM