यूट्यूबर बिनधास्त काव्या औरंगाबादमधून बेपत्ता
सोशल मीडियावर बिनधास्त काव्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते, आणि बिनधास्त काव्या अशा नावाने युट्यूबरही मोठ्या प्रणामात तिचे फॉलोवर्स असल्याचे सांगण्यात येत आहे.
औरंगाबादमधील यूट्यूबर बिनधास्त काव्या बेपत्ता झाली असून औरंगाबाद पोलिसांकडून तिच्या शोधासाठी योग्य ते सहकार्य केले जात नसल्याची तक्रार काव्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. बिनधास्त काव्य कालपासून बेपत्ता असून तिच्या कुटुंबीयांकडून पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. यूट्युबवर बिनधास्त काव्य म्हणून तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिल्यानंतरही पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जात नसल्याची तक्रार काव्याची कुटुंबीयांनी केली आहे. सोशल मीडियावर बिनधास्त काव्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते, आणि बिनधास्त काव्या अशा नावाने युट्यूबरही मोठ्या प्रणामात तिचे फॉलोवर्स असल्याचे सांगण्यात येत आहे.
Published on: Sep 10, 2022 02:49 PM
Latest Videos