माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळण्यासाठी सुरक्षा दिली असेल, 'झेड प्लस' सुरक्षेवर शरद पवार यांची मिश्कील टिप्पणी

माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळण्यासाठी सुरक्षा दिली असेल, ‘झेड प्लस’ सुरक्षेवर शरद पवार यांची मिश्कील टिप्पणी

| Updated on: Aug 23, 2024 | 11:31 AM

शरद पवार यांना केंद्राची झेड प्लस सुरक्षा पुरविण्यावरुन सवाल जवाब सुरु आहेत.शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी मागे हल्लाबोल करीत चपला फेकल्या होत्या. तर उद्धव ठाकरे यांच्या कारच्या ताफ्यावर मनसेने नारळ फेकले होते. तर राज ठाकरे यांच्या कारवर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या.

निवडणूका आहेत म्हणून मला सुरक्षा पुरविली असावी असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. देशातील तीन व्यक्तींना झेड प्लसची सुरक्षा पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत, गृहमंत्री अमित शाह आणि मला झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. कदाचित माझ्या दौऱ्याची माहिती आगाऊ समजण्यासाठी सुरक्षा पुरविली असावी असाही टोला शरद पवार यांनी लगावला आहे. शरद पवार यांना याआधीच राज्य सरकारची झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आलेली आहे. आता त्यांना केंद्राची झेडप्लस सुरक्षा देण्यात आले आहे. आपण या संदर्भात गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. या ‘झेड प्लस’ सुरक्षेवरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांना कोण मारणार ? असा सवाल करीत टिका केली आहे. पवार साहेबांना सुरक्षेची नेमकी गरज काय ते निलेश राणे यांनी सांगू नये त्यानी ५० वर्षात केलेल्या कामापैकी किमान थोड तरी आयुष्यात करुन दाखवावं असा टोला यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला आहे.

 

 

Published on: Aug 23, 2024 11:29 AM