Sugar Factory : 111 कारखान्यांची धुराडी बंद, 88 साखर कारखान्यांवर अतिरिक्त उसाची जबाबदारी, कसा लागणार प्रश्न निकाली?
हंगाम संपूनही साखर कारखाने सुरु राहण्याची ही काही पहिली वेळ नाही. यंदा क्षेत्र वाढल्याने ही नामुष्की ओढावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद झाले असले तरी येथील हार्वेस्टर हे मराठवाड्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे ऊसतोडीचा वेग वाढला आहे. हंगाम आणि तोड या दोन्ही बाबी अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी भीती बाळगू नये. हंगाम लांबला असला तरी तो 5 जूनपर्यंत पूर्ण होईल.
पुणे : राज्यात (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम असताना हंगामाच्या अंतिम टप्प्यात 199 पैकी 111 (Sugar Factory) साखर कारखान्यांची धुराडी ही बंद झाली आहे. असे असतानाच अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उर्वरीत 88 साखर कारखाने हे सुरु ठेवण्यात आले आहेत. जोपर्यंत अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कारखाने हे सुरुच राहणार असल्याचे (Sugar Commissioner ) साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार हे साखर कारखाने हे सुरुच ठेवले जाणार आहेत. शिवाय अतिरिक्त उसाबाबत साखर आयुक्तालय संघ आणि साखर कारखाने हे एकत्रितपणे नियोजन करीत आहेत. अतिरिक्त उसाचा प्रश्न मराठवाड्यातच भेडसावत असल्याने योग्य ते नियोजन केले जात आहे.
5 जूनपर्यंत अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी
हंगाम संपूनही साखर कारखाने सुरु राहण्याची ही काही पहिली वेळ नाही. यंदा क्षेत्र वाढल्याने ही नामुष्की ओढावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद झाले असले तरी येथील हार्वेस्टर हे मराठवाड्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे ऊसतोडीचा वेग वाढला आहे. हंगाम आणि तोड या दोन्ही बाबी अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी भीती बाळगू नये. हंगाम लांबला असला तरी तो 5 जूनपर्यंत पूर्ण होईल. पण शेतकऱ्यांचे नुकसान होऊ द्यायचे नाही हीच भूमिका कायम असल्याचे सहकारी साखर कारखानदारमधील ज्येष्ठ नेते पी.आर. पाटील यांनी सांगितले आहे.
बंद झालेले साखर कारखाने
पश्चिम महाराष्ट्रातील साखऱ कारखान्यांनी हंगामाच्या सुरवातीपासूनच योग्य नियोजन केले होते. त्यामुळे वेळेत गाळप पूर्ण झाले. सध्या कोल्हापूर विभागातील सर्वच्या सर्व 36, पुणे विभागातील 30 पैकी 20 साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहे तर सोलापूर विभागातील 47 पैकी 32 व नगर जिल्ह्यातील 27 पैकी 10 तर औरंगाबाद विभागातील 25 पैकी केवळ 4 साखर कारखाने बंद झाले आहेत. या आकडेवारीहून मराठवाड्यातच अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर असल्याचे दिसून येत आहे.
क्षेत्र वाढल्याने निर्माण झाला प्रश्न
दरवर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न असतोच पण यंदाची स्थिती ही वेगळीच आहे. क्षमतेपेक्षा अधिकचा ऊस अजूनही फडातच उभा आहे. शिवाय क्षमतेपेक्षा साखर कारखान्यांनी अधिकचे गाळप केले असताना ही वेळ ओढावली आहे. हंगामाच्या सुरवातीलाच योग्य नियोजन झाले असते तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले असते. पाण्य़ाची उपलब्धता आणि पोषक वातावरणामुळे लागवड क्षेत्र आणि उत्पादनही वाढले आहे.