व्वा रे पट्ट्या..! 2 बिस्कीट पुडे अन् ताक पिऊन अंगी हत्तीच बळ, ऊसतोड कामगाराचा असा ‘हा’ विक्रम तुम्ही होताल अवाक्
आता 2 बिस्कीट पुढे आणि ताक पिऊन ऊसतोड कामगाराने असा काय विक्रम केला असेल असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. पण एखाद्या कामात सातत्य आणि अथक परिश्रम केल्यास काय होऊ शकते हे एका ऊसतोड कामगाराने दाखवून दिले आहे. ऊसतोड कामगारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांकडून सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात पण जत तालुक्यातील खैराव येथील ईश्वराने असे काय कर्तुत्व केले आहे की, वारणा साखर कारखान्याला देखील त्याची दखल घ्यावी लागली आहे.
सांगली : आता 2 बिस्कीट पुढे आणि ताक पिऊन (Sugarcane worker) ऊसतोड कामगाराने असा काय विक्रम केला असेल असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. पण एखाद्या कामात सातत्य आणि अथक परिश्रम केल्यास काय होऊ शकते हे एका ऊसतोड कामगाराने दाखवून दिले आहे. ऊसतोड कामगारांच्या भूमिकेवर (Farmer) शेतकऱ्यांकडून सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात पण जत तालुक्यातील खैराव येथील ईश्वराने असे काय कर्तुत्व केले आहे की, वारणा (Sugar Factory) साखर कारखान्याला देखील त्याची दखल घ्यावी लागली आहे. आहो या ऊस टोळीतील ईश्वर सांगोलकर या कामगाराने अशोक सावंत यांच्या शेतात एका दिवसात 20 गुंठ्यातील 16 टन ऊस तोडून विक्रम केला आहे. आणि तो ही दिवसभरात केवळ 2 बिस्कीट पुडे आणि ताक पिऊन. त्याच्या या विक्रमाची सबंध पंचक्रोशीत चर्चा असून त्याचे कष्ट पाहून वारणा साखर कारखाना प्रशासनाने थेट ऊसाचा फड गाठूनच त्यांचा सत्कार केला.
वय वर्ष 50 अन् 25 वर्षापासून ऊसतोडणीचे काम
जत तालुक्यातील खैराव गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील असणारे ईश्वर सांगोलकर हा गेली 25 वर्षांपासून वारणा साखर कारखाना आणि इतरही साखर कारखान्याला ऊसतोड मजूर म्हणून काम करत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील वाळवा तालुक्यासह अनेक तालुक्यात ऊसतोडी चे कामे केली आहेत. मागील पंधरा दिवसापासून कुंडलवाडी येथे ऊसतोड सुरु आहे. सागर सावंत यांच्या शेतात ऊसतोड सुरु असताना ईश्वर सांगोलकर याने एकट्याने दिवसाकाठी 16 टन ऊसतोड करून एक नवा विक्रम केला आहे.
अन् पावती पाहून सर्वजणच अवाक्
ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर चालकासोबत ऊसतोडीचा सर्व तपशील दिला जातो. संजय फाटक यांच्या ट्रक्टरमधून ईश्वर सांगोलकर यांनी पाठवलेला ट्रक्टर पाठविण्यात आला. या दरम्यान, ऊसतोडणीचा तपशील कारखाना प्रशासनाने पाहिल्यानंतर ही बाब समोर आली आहे. कारण एका दिवसात त्याने 16 टन ऊस तोडला होता. या टोळीमध्ये 10 कोयते म्हणजे 10 पुरुष आणि 9 महिला असे काम करत आहेत. तसे पाहिले तर एक ऊसतोड मजूर हा एका दिवसापोटी फक्त दोन टन ऊस तोडत असतो. मात्र एका दिवसात ईश्वर सांगोलकर याने एका दिवसात 16 टन ऊस तोडण्याची किमया केली आहे.
ऊसतोडीत आहेत 10 कोयते
सांगली जिल्ह्यातील वारणा साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु आहे. याकरिता वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथील संजय फाटक यांनी ऊसटोळीचा पुरवठा केला आहे. या टोळीमध्ये टोळीमध्ये 10 कोयते म्हणजे 10 पुरुष आणि 9 महिला असे काम करत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून कुंडलवाडी येथे ऊसतोडणी सुरु आहे. अशोक सावंत यांच्या शेतात एका दिवसात 20 गुंठ्यातील 16 टन ऊस तोडून विक्रम केला. याबद्दल वारणा साखर कारखाना प्रशासनाने त्यांचा सत्कार केला.
संबंधित बातम्या :
काय सांगता? ‘या’ कारणास्तव खानदेशातील खरेदी केंद्र बंद, घ्या जाणून
Kharif Season : सोयाबीन, कापसानंतर आता तुरीवर मदार, आवक सुरु दराचे काय?