Farming : बनू शकले नाही सरकारी अधिकारी, आता शेतीतून कमवतात २५ लाखांचे वार्षिक उत्पन्न
भाजीपाला लागवड सुरू करण्यापूर्वी त्यांनी प्रशिक्षण घेतले. आता ते आपल्या शेतात इजरायली गहू, ऑर्गेनिक गहू आणि काळा गहू उगवत आहेत.
जयपूर : तंत्रज्ञानाचा वापर वाढला. व्यक्तीची जागा मशीन घेत आहेत. याचा परिणाम शेतीवर झाला आहे. शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघीतले जात आहे. शिकलेले युवक शेतीकडे वळत आहेत. सुशिक्षित लोकं भाजीपाला लागवड करत आहेत. यातून त्यांचे उत्पन्नही वाढले आहे. अशाच एका युवकाची ही कहाणी. भगवंत सिंह असे त्यांचे नाव. राजस्थानातील कोटा जिल्ह्यातील पीपल्दा गावचे रहिवासी. त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले. आता ते व्यावसायिक पद्धतीने शेती करत आहेत.
भगवंत सिंह म्हणतात, त्यांना आरएएस अधिकारी बनायचं होतं. कित्तेक वेळा परीक्षाही दिली. परंतु, यश मिळालं नाही. एलएलबीचा अभ्यास केल्यानंतर वकिली सुरू केली. सोबतच ते गावात शेती करू लागले. भगवंत सिंह म्हणतात, सुरुवातीला ते पारंपरिक शेती करत होते. त्यातून उत्पन्न कमी मिळत होते.
भाजीपाला लागवड सुरू करण्यापूर्वी त्यांनी प्रशिक्षण घेतले. आता ते आपल्या शेतात इजरायली गहू, ऑर्गेनिक गहू आणि काळा गहू उगवत आहेत. यातून त्यांचा चांगला नफा मिळत आहे.
ऋतुनुसार लावतात भाजीपाला
भाजीपाला लागवडीवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. ऋतूनुसार ते वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला लावत आहेत. गोबी, टमाटर, शिमला मिर्ची, लवकी, खीरा, काकडी आणि वांगे यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला लागवड करतात. यातून त्यांना चांगला फायदा होत आहे.
त्यांच्या शेतात मजूर काम करतात. भगवत सिंह चांगल्या कमाईसोबत रोजगारही देत आहेत. भगवत सिंह २५ एकर जागेत पारंपरिक आणि आधुनिक शेती करत आहेत. यातून त्यांना वर्षाला २० ते २२ लाख रुपये उत्पन्न होत आहे. पिकांसाठी ड्रिपींग सिस्टमचा वापर ते करतात. यामुळे पाण्याची बचत होते.
शेणखताचा वापर
रासायनिक खताऐवजी ते शेणाचा खत म्हणून वापर करतात. भगवत सिंह यांना उत्कृष्ट शेती केली म्हणून कित्तेक पुरस्कार मिळाले आहेत. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी त्यांना आधुनिक शेती केल्याबद्दल सन्मानित केले होते.