Gondia | गोंदियात Cycle Sunday Group ची अनोखी दिलदारी, पक्षांनाही मिळतेय थंडगार पाणी
सध्याच्या उन्हाच्या झळामध्ये पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती अशी वेळ आली आहे. रखरखत्या उन्हात थंडगार पाणी मिळाले तर त्यापेक्षा सुखद ते काय? हे सर्व माणसांसाठी शक्य आहे पण पशू-पक्षांचे काय? वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. पाण्याच्या शोधात पक्षी थेट मानव वस्तीमध्ये दाखल होत आहेत. असे असतानाही पक्षांना पाणी मिळत नाही. त्यामुळे गोंदियातील सायकल संडे ग्रुपने एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. यंदाच नाही तर गेल्या तीन वर्षापासून हा ग्रुप पक्षांची तहान भागवत आहे ते ही थंडगार पाण्याने.
गोंदिया : सध्याच्या (Summer Season) उन्हाच्या झळामध्ये पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती अशी वेळ आली आहे. रखरखत्या उन्हात थंडगार पाणी मिळाले तर त्यापेक्षा सुखद ते काय? हे सर्व माणसांसाठी शक्य आहे पण पशू-पक्षांचे काय? वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. पाण्याच्या शोधात पक्षी थेट मानव वस्तीमध्ये दाखल होत आहेत. असे असतानाही (Water to birds) पक्षांना पाणी मिळत नाही. त्यामुळे (Gondia) गोंदियातील सायकल संडे ग्रुपने एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. यंदाच नाही तर गेल्या तीन वर्षापासून हा ग्रुप पक्षांची तहान भागवत आहे ते ही थंडगार पाण्याने. या ग्रुपच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कोतुक होत आहे. शहरातील विविध भागात तब्बल 3 हजार मातीचे पाणवटे लावण्यात आले आहेत. शिवाय यामध्ये पाणी भरण्याची जबाबदारी ही गोंदिया शहरातील नागरिकांवर सोपवण्यात आली आहे.
गोंदियातील पारा चाळीशी पार
उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि विदर्भात सूर्य आग ओकतोय अशी अवस्था आहे. सध्या उन्हाचा पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. दरवर्षी एप्रिल – मे मध्ये जिल्ह्यातील तापमान हे 48 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा ह्या ठरलेल्याच असतात. नैसर्गिक पाणवठे आटतात त्यामुळे पक्षी शहराकडे धाव घेत असून . शहरात आलेल्या पक्षांचा पाण्याअभावी मृत्यू होऊ नये म्हणून गोंदियातील सायकल संडे ग्रुपच्या वतीने मागील 3 वर्षापासून शहरातील बागेत तसेच शाशकीय कार्यलय, मंदिर, विश्राम ग्रुह, वसाहतीतिल झाडांवर हे मातीचे पाणवठे लावण्यात येत असून या माध्यमातून पक्ष्यांचा थंडगार पाणी मिळणार आहे.
3 पाणवट्यातून थंडगार पाणी
केवळच एकाच ठिकाणी पाणवटे उभारुन त्याचा उपयोग होणार नाही म्हणून या ग्रुपने शहरातील विविध भागांमध्ये तबब्ल 3 हजार पाणवटे उभारले आहेत. विशेष म्हणजे पक्षांनाही थंडगार पाणी मिळावे या उद्देशाने हे पाणवटे मातीचे बनवण्यात आले आहेत. शहरातील गल्ली बोळात आणि सार्वजनिक ठिकाणी हे पाणवटे दिसून येतात. गेल्या तीन वर्षापासून या ग्रुपचा हा अनोखा उपक्रम सुरु आहे. अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले आहे. उन्हाळ्याला सुरवात होताच असे पाणवटे उभारले जातात पण काही दिवसातच ते कोरडेठाक पडतात. पण संडे सायकल ग्रुपने यामध्ये सातत्य ठेवले असून पाणवट्यांमध्ये पाणी ठेवण्याची जबाबदारी गोंदियातील नागरिक पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गोंदियाकरांची जबाबदारी काय?
संबंध उन्हाळ्यामध्ये पाणवट्यांमध्ये पाणी कायम ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येक गोंदियातील नारगरिकांची राहणार आहे. शहरातील वेगेवगळ्या भागात 3 हजार पाणवटे उभारण्यात आले आहे. त्या-त्या भागातील नागरिकांनी हे पाणवटे कोरडेठाक पडणार नाहीत याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.म्हणूनच गेल्या तीन वर्षापासून या अनोख्या उपक्रमात सातत्य राहिले आहे.
संबंधित बातम्या :
Photo Gallery : वाढत्या उन्हामुळे विहिरींनी तळ गाठला, आता धरणातील पाण्याचा पिकांना आधार
Excess Sugarcane: आता शिल्लक उसाला अनुदान..! राज्य सरकारची घोषणा शेतकऱ्यांना प्रतीक्षा अंमलबजावणीची