Sugarcane Sludge : राज्यात 5 लाख टन ऊसाचे गाळप, ‘या’ विभागाची आघाडी कायम
यंदाचा हंगाम (Sugar Production) साखरेच्या उत्पादनासाठी चांगला राहिलेला असून 9.86 टक्के उताऱ्याने आतापर्यंत 5 कोटी 66 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात 15 ऑक्टोंबरपासून (Sugarcane Sludge) ऊस गाळपास सुरवात झाली होती. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून अधिक वेग पकडला असून साखर उताऱ्यात कोल्हापूर विभागाची आघाडी ही कायम राहिलेली आहे.
पुणे : सध्या ऊस गाळप हंगाम मध्यावर आलेला आहे. असे असताना ज्या मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र कमी होते त्या विभागात 1 कोटी 14 लाख टन ऊसाचे गाळप झाले आहेत तर (Maharashtra) राज्यात 5 कोटी 73 लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. यंदाचा हंगाम (Sugar Production) साखरेच्या उत्पादनासाठी चांगला राहिलेला असून 9.86 टक्के उताऱ्याने आतापर्यंत 5 कोटी 66 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात 15 ऑक्टोंबरपासून (Sugarcane Sludge) ऊस गाळपास सुरवात झाली होती. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून अधिक वेग पकडला असून साखर उताऱ्यात कोल्हापूर विभागाची आघाडी ही कायम राहिलेली आहे. कोल्हापूर विभागाचा सरासरी उतारा हा 11.21 टक्के राहिलेला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा अधिकचे उत्पादन होईल असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे. वाढत्या क्षेत्राबरोबर ऊसाचे उत्पन्न वाढत आहे. देशात सर्वाधिक उत्पन्न महाराष्ट्रातून होत आहे.
पूरग्रस्त भागातील तोडणी रखडली
पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील ऊस अद्यापही वावरातच आहे. साखरेच्या उताऱ्यात वाढ झाली असली तरी उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा समजल्या जाणाऱ्या भागातील तोडणी अद्याप रखडेलेली आहे. हंगाम सुरु होताच या भागातील ऊसाची तोडणी करावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, पूरामुळे निर्माण झालेल्या परस्थितीमुळे तोडणी ही रखडलेली आहे. अद्यापही वेळेत तोडणी होत नाही. आता पावसाचे पाणी साचलेल्या क्षेत्रातीलच ऊस शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे खराब झालेला ऊस कारखान्यांना घालवणे शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे.
साखरेच्या उताऱ्यासाठी पोषक वातावरण
सध्याच्या वातावरणाचा परिणाम हा रब्बी हंगामातील पिकांवर आणि फळ बागांवर होत असला तरी ही थंडी साखरेचा उतारा वाढवण्यास फायदेशीर ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून सबंध राज्यात थंडीचा कडाका आहे. पश्चिम महाराष्ट्रातही हुडहुडी भरत आहे. याचा परिणाम साखरेच्यान उताऱ्यावर अनुकूल होत आहे. भविष्यात असेच वातावरण कायम राहिले तर उताऱ्यात वाढच होणार आहे असा अंदाज साखर कारखानदार व्यक्त करीत आहेत.
राज्यात खासगी साखर कारखान्यांची संख्या अधिक
हंगामाच्या सुरवातीलाच कारखाना सुरु करण्याबाबत साखर आयुक्तालयाकडून नियमावली ठरवून देण्यात आली होती. विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाईही करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यात 192 साखर कारखाने हे सुरु आहेत. यापैकी 97 खासगी तर 95 साखर कारखाने ही सहकारी सुरु आहेत. या कारखान्याच्या माध्यमातून गाळप सुरु असून सर्वाधिक गाळप हे पश्चिम महाराष्ट्रात झालेले आहे.
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांचा नाद खुळा : कांद्याने झाली भरभराट, घरावर 150 किलोचा ‘स्टॅच्यू’ उभारुन केली उतराई
Latur Market: सोयाबीन दरात चढ-उतार असतानाही विक्रमी आवक, काय आहेत कारणे?