Video : पाण्याच्या शोधात असलेल्या 5 गायी पडल्या विहिरीत, गायींना वाचवताना शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी

हवामान विभागाने जरी अवकाळी पावसाचा इशारा दिला असला तरी मराठवाड्यात उन्हाचा पारा वाढतच आहे. वाढत्या उन्हामुळे जनावरांचीही पाण्यासाठी भटकंती होत आहे. पाण्याचा शोधात असलेल्या 5 गायी थेट विहिरित पडल्याची घटना जिंतूर तालुक्यातील कोरवाडी शिवारात घडली आहे. यापैकी शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर 4 गायींना विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले मात्र, एका गायीचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

Video : पाण्याच्या शोधात असलेल्या 5 गायी पडल्या विहिरीत, गायींना वाचवताना शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी
विहिरित पडलेल्या गायीला वाचवताना शेतकऱ्यांना अथक परिश्रम करावे लागले.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 3:09 PM

परभणी :  (Meteorological Department) हवामान विभागाने जरी अवकाळी पावसाचा इशारा दिला असला तरी (Marathwada) मराठवाड्यात उन्हाचा पारा वाढतच आहे. वाढत्या उन्हामुळे जनावरांचीही पाण्यासाठी भटकंती होत आहे. पाण्याचा शोधात असलेल्या 5 गायी थेट विहिरित पडल्याची घटना जिंतूर तालुक्यातील कोरवाडी शिवारात घडली आहे. यापैकी शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर 4 (Cow) गायींना विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले मात्र, एका गायीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. वाढत्या उन्हामुळे तहानलेल्या गाय़ी विहिरिवर आल्या आणि ही दुर्घटना झाली. मात्र, जनावरांवर असलेल्या शेतकऱ्याने लागलीच इतरांना बोलावून घेतल्याने इतर चार गायींना जीवदानच मिळाले आहे. वाढत्या उन्हाबरोबर आता पाण्याचे संकटही अधिक गडद होत आहे.

पाचही नील गायी, एकीचा मात्र मृत्यू

पाणी पिण्यासाठी विहिरीवर आलेल्या पाचही गायी ह्या निल जातीच्या होत्या. तहानलेल्या या गायींनी विहिरीचा अंदाजच आला नाही. शिवाय विहिरीला कुठे कठडा नसल्याने सर्वच्या सर्व गायी ह्या विहिरीत पडल्या. भर उन्हात एका शेतकऱ्याने जनावरे पाण्यावर आणली असता ही दुर्घटना झाली होती.

शेतकऱ्यांच्या प्रयत्नांची पराकष्टा

शेतकरी पोटच्या पोराप्रमाणे जनावरांचा सांभाळ करीत असतो. शिवाय जनवरांसाठी तो काय करु शकतो याचा प्रत्यय कोरवाडी शिवारात आला. गायी पाण्यात पडल्याचे समजताच दोन शेतकऱ्यांनी थेट विहिरीतच उडी घेतली. कासरा(दोर) च्या सहायाने गायींच्या पोटाला बांधूले व काही शेतकऱ्यांनी गायींना ओढून घेतले. उन्हाच्या झळा असह्य होत असताना शेतकऱ्यांनी यातील 4 गायींचा जीव वाचवला. मात्र, एक गायी बराच वेळ विहिरीत राहिली. शिवाय वेळेत तिला बाहेर काढणेही शक्य झाले नाही. त्यामुळे एका गायीचा मृत्यू झाला तर चार गायी ह्या बाहेर काढण्यात आल्या आहेत.

दोन तास गायी पाण्यात

पाण्याच्या शोधात गेलेल्या गायी तब्बल दोन तास विहिरीत होत्या. शेतकरी लागलीच गोळा झाले पण एका-एका गायीला बाहेर काढताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले. यातच उन्हाच्या झळा अधिकच तीव्र होत्या. अधिकचा वेळ गायी पाण्यात राहिल्याने एकीचा मृत्यू झाला तर इतर चार गायींना साधी जखम पण नाही.

संबंधित बातम्या :

EXport : फळपिकांच्या निर्यातीसाठी मराठवाड्यात उभारल्या जाणार पायाभूत सुविधा,कृषी विभागाचे नेमके धोरण काय?

Rabi Season: पीक संरक्षणासाठी शेतकऱ्याचं अनोखं जुगाड, एका ठिकाणी बसून 2 एकरातील क्षेत्र निगराणीखाली

Watermelon : हंगामी पिकाने शेतकऱ्यास तारले, कोकलेगावतल्या पाटलांनी करुन दाखविले

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.