Chickpea Crop : कृषी विभागाच्या एका निर्णयामुळे हरभरा विक्रीचा मार्ग मोकळा, उत्पादन वाढले तरी चिंता मिटली

यंदा रब्बी हंगामात पोषक वातावरण आणि मुबलक पाण्यामुळे हरभऱ्याचे पीक बहरात होते. त्यामुळे हेक्टरी उत्पादकतेमध्ये वाढ होणे अपेक्षित असताना कृषी विभागाकडून जिल्ह्याची उत्पादकता केवळ 6 क्विंटल 50 किलो ठरविण्यात आली होती. म्हणजे याप्रमाणेच हरभऱ्याची विक्री ही खरेदी केंद्रावर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात काढणी सुरु असताना हेक्टरी 10 ते 11 क्विंटलचा उतारा पडत आहे.

Chickpea Crop : कृषी विभागाच्या एका निर्णयामुळे हरभरा विक्रीचा मार्ग मोकळा, उत्पादन वाढले तरी चिंता मिटली
हमीभाव केंद्र
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 5:01 AM

उस्मानाबाद : यंदा (Rabi Season) रब्बी हंगामात पोषक वातावरण आणि मुबलक पाण्यामुळे हरभऱ्याचे पीक बहरात होते. त्यामुळे हेक्टरी उत्पादकतेमध्ये वाढ होणे अपेक्षित असताना (Agricultural Department) कृषी विभागाकडून जिल्ह्याची उत्पादकता केवळ 6 क्विंटल 50 किलो ठरविण्यात आली होती. म्हणजे याप्रमाणेच (Chickpea Crop) हरभऱ्याची विक्री ही खरेदी केंद्रावर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात काढणी सुरु असताना हेक्टरी 10 ते 11 क्विंटलचा उतारा पडत आहे. त्यामुळे उर्वरीत हरभऱ्याची विक्री करायची कुठे असा सवाल उपस्थित झाला होता. खरेदी केंद्र सुरु होण्यापूर्वीच कृषी विभागाने राज्यातील 33 जिल्ह्यातील हरभऱ्याची उत्पादकता जाहीर केली होती. या अंदाजित उत्पादकतेमुळे शेतकऱ्यांची अडचण झाली होती. अखेर नियमात बदल करुन जिल्ह्यासाठी 10 क्विंटलची उत्पादकता ग्राह्य धरुन आता खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून हमीभाव केंद्रावर हरभरा विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे.

असे टळले शेतकऱ्यांचे नुकसान

जिल्हानिहाय हमीभावाने हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रावर 5 हजार 230 तर खुल्या बाजारात हरभऱ्याला 4 हजार 600 चा दर आहे. मात्र, उत्पादन वाढले तरी कृषी विभागाने ठरवल्याप्रमाणेच हेक्टरी केवळ 6 क्विंटल 50 किलोच हरभरा हा खरेदी केंद्रावर विक्रीची परवानगी होती. म्हणजेच उर्वरीत हरभरा हा खुल्या बाजारात कमी किंमतीने विकण्याची नामुष्की आली होती. पण आता नियमात बदल केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळलेले आहे. 1 मार्चपासून हमीभाव केंद्र सुरु झाली असून आता कुठे शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे.

कृषी विभागाचा निर्णय

उत्पादकता वाढूनही घालून दिलेली नियमावली ही शेतकऱ्यांसाठी नुकसानीची ठरत आहे. प्रत्यक्षात होणारे उत्पादन आणि कृषी विभागाने जाहीर केलेली उत्पादकता यामध्ये मोठी तफावत असल्याचे येथील लोकप्रतिनीधींनी निदर्शनास आणून दिले होते. शिवाय बांधावरची परस्थितीही तशीच होती. त्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून नियमात बदल करुन आता हेक्टरी 10 क्विंटल उत्पादन असेल तरी खरेदी केंद्रावर खरेदी करता येणार आहे.

नेमकी अट कशामुळे ?

खरेदी केंद्रावर शेतीमालाची विक्री करण्यासाठी पिकपेऱ्याची नोंदणी गरजेची असते. या नोंदणीवरच शेतीमालाची खरेदी केली जाते. पिकपेऱ्यावरील क्षेत्र आणि प्रत्यक्षात उत्पादकतेनुसार शेतीमालाची आवक झाली तर खरेदी केली जाते. अन्यथा व्यापाऱ्यांचा शेतीमाल खरेदी केंद्रावर येण्याची शक्यता असते म्हणून पिकपेऱ्याची आणि उत्पादकतेप्रमाणेच खरेदी करण्याचा नियम घालून दिला आहे. त्यामुळे कारभारात नियमितता येते.

संबंधित बातम्या :

Nandurbar : जाळायचे होते पाचट अन् जळाला ऊस, अवघ्या दोन तासात 12 एकरातील फड जळून खाक

Latur Market : खरेदी केंद्रावर हरभरा दराची हमी, बाजारपेठेतली आवक निम्याने घटली, सोयबीनही स्थिरावले

Video: अमरावती बाजारसमितीत हमालाची गुंडगिरी, शेतकऱ्याला मारहाण, बाजारसमितीचं कारवाईचं आश्वासन

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.