पॉलीहाऊसमध्ये शेती करणारा शेतकरी मालामाल, महिन्याला कमावतो १ लाखाचे पॅकेज

. एका शेतकऱ्याने काकडीचे उत्पादन घेतले. ही काकडी त्यांनी पॉलीहाऊसमध्ये लावली. याचा त्यांना चांगला फायदा होत आहे.

पॉलीहाऊसमध्ये शेती करणारा शेतकरी मालामाल, महिन्याला कमावतो १ लाखाचे पॅकेज
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 4:49 AM

नवी दिल्ली : शेती परवडत नाही, अशी बहुतेकांची ओरड असते. पण, ती योग्य पद्धतीने केल्यास त्याचा फायदा होतो. असाच एक प्रकार समोर आला आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत काही लोकं आधुनिक शेती करतात. कधी-कधी त्यांचे प्रयोग फसतातही. पण, ते प्रयोग यशस्वी करून दाखवणारे काही कमी नाहीत. एका शेतकऱ्याने काकडीचे उत्पादन घेतले. ही काकडी त्यांनी पॉलीहाऊसमध्ये लावली. याचा त्यांना चांगला फायदा होत आहे.

काकडी खाणे प्रत्येकाला पसंत आहे. काकडीत व्हिटॅमीन डी, पोटॅशीयम, फास्फरस, व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी १, व्हिटॅमीन बी ६, व्हिटॅमीन सी आणि आयरानची मात्रा असते. नियमित काकडी खाल्ल्यास शरीर तंदुरुस्त राहते. तसेच काकडीत फायबरही मोठ्या प्रमाणात असते. काकडी खाल्यामुळे शौचास साफ होते. त्यामुळेच काकडीची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी पॉलीहाऊसमध्ये काकडीची शेती करतात. यामुळे शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

पॉलीहाऊसमध्ये काकडीची शेती केल्यास उन्ह, पाऊस, वादळ, लू आणि थंडी यांचा परिणाम होत नाही. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये पॉलीहाऊसमध्ये शेती करू शकता. यामुळे उत्पादन वाढते. शेतकऱ्यांचा चांगला फायदा होतो.

असेच एक शेतकरी आहेत दशरत सिंह. दशरत यांनी पॉलीहाऊसमध्ये शेती सुरू केली. यातून त्यांचा चांगला फायदा होत आहे. दशरत सिंह अलवर जिल्ह्यातील इंदरगडचे रहिवासी आहेत. ते खूप कालावधीपासून पॉलीहाऊसमध्ये काकडीची शेती करतात. यातून त्यांना चांगला नफा मिळतो.

दशरत सिंह आधी पारंपरिक शेती करत होते. त्यांना पॉलीहाऊसबाबत माहिती नव्हती. त्यानंतर ते उद्यान विभागाच्या संपर्कात आले. त्यांना पॉलीहाऊसमध्ये शेती करण्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी ४ हजार वर्ग मीटरमध्ये पॉलीहाऊस तयार केले. त्यात काकडीची शेती सुरू केली.

दशरत सिंह यांचा मुलगा लखन यादव याने सांगितले की, पॉलीहाऊसमध्ये सुपर ग्लो बीजाचा वापर करतात. यामुळे पिकाची वाढ चांगली होते. काकडीचे उत्पन्न ४ ते ५ महिने निघते. काकड्या विक्री करून ते सहा लाख रुपये निव्वड नफा मिळवतात.

बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....