बळीराजासमोरील हे संकट पाहून तुमच्या डोळ्यातच पाणी येईल, जेव्हा पोटच्या गोळ्यापेक्षा जिवापाड प्रेम करणारी जनावरे…

कैलास घोटेकर हे मळ्यात राहतात, घराच्या बाजूलाच जनावरांचा गोठा आहे. तिथेच त्यांनी जनावरांसाठी चारा म्हणून सोयाबीन आणि मकाचा भुसा ठेवला होता. आणि बाजूलाच जनावरे बांधत असतात.

बळीराजासमोरील हे संकट पाहून तुमच्या डोळ्यातच पाणी येईल, जेव्हा पोटच्या गोळ्यापेक्षा जिवापाड प्रेम करणारी जनावरे...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 9:14 AM

नाशिक : बळीराजावर एका मागून एक संकट येतच आहे. कधी आस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट आल्याने बळीराजा ( Farmer News )  पुरता हवालदिल होत असतो. त्यामध्ये आता नाशिकच्या एका शेतकऱ्यावर आलेले संकट अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरत आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे हृदयद्रावक ( Crying Farmer ) घटना घडली आहे. शेतात घर बांधून राहत असलेले कैलास घोटेकर यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिले आहे. मध्यरात्रीच्या वेळी अचानक जनावरे जोर जोरात ओरडू लागल्याने घोटेकर कुटुंब घराच्या बाहेर आले होते. त्यांच्या समोर जे दृश्य होते ते पाहून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

उन्हाळा असतांना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यासाठी शेतकरी पावसाळ्यातील पिकांपासून चारा तयार करत आणि त्याची साठवणूक करतात. अशाच स्वरूपाची साठवणूक कैलास घोटेकर यांनी केली होती.

कैलास घोटेकर हे मळ्यात राहतात, घराच्या बाजूलाच जनावरांचा गोठा आहे. तिथेच त्यांनी जनावरांसाठी चारा म्हणून सोयाबीन आणि मकाचा भुसा ठेवला होता. आणि बाजूलाच जनावरे बांधत असतात.

हे सुद्धा वाचा

मात्र, मध्यरात्रीच्या वेळी चाऱ्याला मोठी आग लागली. यामध्ये बाजूलाच असलेली जनावरे जोरजोरात ओरडू लागली होती. त्यामुळे घोटेकर कुटुंब बाहेर आले आणि बघताच गोठयातून आगीचे लोळ बाहेर पडत होते.

कुटुंबाने आग विझवून जनावरे त्यातून बाहेर काढले. पण यामध्ये 7 जनावरे होरपळली आहे. 30 ते 40 टक्के जनावरे भाजले गेले आहे. यामध्ये सहा मोठे जनावरे आहेत. तर एक वासरू आहे.

आगीची घटना खरंतर रात्रीची वेळ असल्याने उशिरा लक्षात आली होती. त्यामध्ये आगीच्या वाफेने जनावरी चांगलीच भाजली गेली असून त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले आहे.

जोरजोरात ओरडणारे पशूधन बघू अनेकांना रडू कोसळल आहे. घोटेकर कुटुंबाचा तर अक्षरशः अश्रूंचा बांध फुटला आहे. त्यामध्ये पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पशूधनावर उपचार केले आहे.

आगीत भाजलेल्या जनावरांना मलम लावण्यात आला आहे. काही इंजेक्शन देण्यात आले आहे. त्यामध्ये वेदनाशामक प्रतिजैविके, व्हिटॅमिन्सचे इंजेक्शन आणि सलाईन दिल्या आहेत.

याप्रकरणी घोटेकर कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. लाखों रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने याची दखल घेऊन मदत करण्याची मागणी होऊ लागली आहे. गावपातळीवर पंचनामा करून मदत होईल अशी अपेक्षा आसपासच्या शेतकऱ्यांना आहे.

शेतीमालाला अगोदरच भाव नाही, त्यातच असं दुसरं संकट निर्माण झाल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. त्यामुळे आर्थिक मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे गावातील दुर्दैवी घटना अनेकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.