जगातील सर्वात महाग आंबा तयार करतो हा शेतकरी, प्रतीकिलो भाव वाचून व्हाल आश्चर्यचकित

मियाजाकी आंब्याचे उत्पादन करणारा शेतकरी म्हणतो, या आंबा स्वादिष्ठ आणि गोड असतो. जागतिक बाजारात याची किंमत अडीच ते तीन लाख रुपये किलो आहे.

जगातील सर्वात महाग आंबा तयार करतो हा शेतकरी, प्रतीकिलो भाव वाचून व्हाल आश्चर्यचकित
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 6:03 PM

नवी दिल्ली : जगात सर्वात महाग आंब्याची चर्चा होते तेव्हा मियाजाकी प्रजातीचे नाव समोर येते. मियाजाकी आंब्याची लागवड जपानमध्ये केली जाते. पण, भारतातील शेतकरी मियाजाकी आंब्याचे उत्पादन काढू लागले आहेत. मियाजाकी आंबा टेस्ट आणि सुगंधासाठी ओळखला जातो. विशेषता म्हणजे या जातीच्या आंब्याचे भाव. मियाजाकी आंबा जगात सर्वात महाग आहे. एक किलो मियाजाकी आंब्याची किंमत अडीच ते तीन लाख रुपये आहे. झारखंड, मध्यप्रदेश नंतर ओडिशातील शेतकऱ्याने मियाजाकी आंबा उत्पादित केले. हा आंबा स्वादिष्ठ आणि गोडव्यासाठी ओळखले जातात.

मियाजाकी आंबा सर्वात महाग

झारखंड, मध्य प्रदेश पाठोपाठ आणि ओडिशातही एका शेतकऱ्याने मियाजाकी आंब्याचे उत्पादन काढले. माझ्या फळबाग लागवडीतील मियाजाकी आंबा सर्वात महाग असल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे. ओडिशातील हा मियाजाकी आंबा पाहण्यासाठी लोकं दुरवरून येत आहेत. ओडिशातील कालाहांडी जिल्ह्यातील भोई येथे हा शेतकरी राहते. त्यांनी आपल्या फळबाग लागवडीत मियाजाकी आंब्याची शेती केली.

अडीच ते तीन लाख रुपये किलो

मियाजाकी आंब्याचे उत्पादन करणारा शेतकरी म्हणतो, या आंबा स्वादिष्ठ आणि गोड असतो. जागतिक बाजारात याची किंमत अडीच ते तीन लाख रुपये किलो आहे. भोई म्हणतात, मी माझ्या फळबागेत बऱ्याच प्रकारचे आंबे उत्पादित करतो. पण, मियाजाकी आंब्याचे उत्पादन करणे हे त्यांचे स्वप्न होते. मियाजाकीच्या बियांसाठी त्यांनी फळभाग विभागाशी संपर्क केला. बी मिळाल्यानंतर त्यांनी मियाजाकीचे बी रोवले.

श्रीमंत लोकंच करतात खरेदी

जगातील सगळ्यात महाग आंब्याचे मूळ नाव हे जापनी भाषेत ताईयो नो तमागो आहे. जपानच्या मियाजाकी राज्यात या आंब्याची शेती केली जाते. जगातील श्रीमंत लोकं हा आंबा खातात. बाजारात या आंब्याची विक्री केली जात नाही. या आंब्याचा लीलाव होतो. मियाजाकी आंबा रायपूर आणि सिलीगुडीमध्ये आयोजित मँगो फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला. बिझनेस इनसायडरच्या रिपोर्टनुसार, मियाजाकी आंबा इरवीन आंब्याची जाती आहे. इरवीन आंब्याची शेती जगातील इतर भागातही केली जाते.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....